भारत सरकारच्या विविध पॅरामिलिट्री म्हणजेच निमलष्करी दलांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP), सशस्त्र सीमा दल (SSB), सचिवालय सुरक्षा दल (SSF) आणि आसाम रायफल्स (AR) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 25,487 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (SSC GD Constable Bharti 2026) ते एसएससीच्या अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 01 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून 31 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. उमेदवारांची निवड कंप्युटर आधारित परीक्षा (CBT), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST) आणि वैद्यकीय चाचणी यांच्या आधारे केली जाणार आहे
भारत सरकारच्या विविध पॅरामिलिट्री म्हणजेच निमलष्करी दलांमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP), सशस्त्र सीमा दल (SSB), सचिवालय सुरक्षा दल (SSF) आणि आसाम रायफल्स (AR) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 25,487 पदे भरली जाणार आहेत.
SSC मार्फत GD कॉन्स्टेबल भरती 2026 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक आणि अंतिम तारीख याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
संस्थेचे नाव: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
जाहिरात क्र.: –
भरती प्रकार: भारत सरकारच्या विविध पॅरामिलिट्री दलांमध्ये पर्मनंट सरकारी नोकरीची संधी
भरती श्रेणी: केंद्र शासन
पदाचे नाव: कॉन्स्टेबल
पदांची संख्या: 25487 जागा
रिक्त जागांचा तपशील: